Mahesh Vishnupant Kothe Passes Away: सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन; प्रयागराज येथे कुंभात स्नान केल्यानंतर आला हृदयविकाराचा झटका

माहितीनुसार, त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केले, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Mahesh Vishnupant Kothe Passes Away

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रातील नेते आणि सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराजच्या कुंभमेळ्यात निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. महेश कोठे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सोलापूरचे वातावरण शोकाकुल झाले आहे. थंडीत रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. महेश कोठे हे त्यांच्या काही मित्रांसह कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. माहितीनुसार, त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केले, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सोलापुरात काँग्रेस मजबूत करण्यात आणि सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात कोठे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची होती. महेश कोठे यांच्या अकाली निधनाने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (हेही वाचा: Maha Kumbh Mela 2025: मकर संक्रांतीनिमित्त पहिले अमृत स्नान सुरू, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महानिर्वाणी पंचायती आखाड्याने केले पवित्र स्नान)

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now