राज्यातील 3 शैक्षणिक संस्थांनी आशियातील सर्वोत्कृष्ट 200 उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या संस्था पुढीलप्रमाणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे. या सर्व संस्थांचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
आशियातील सर्वोत्कृष्ट २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे यांनी स्थान प्राप्त केले आहे. आपली शैक्षणिक गुणवत्ता जपत काम करणाऱ्या या सर्व संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन!
— Uday Samant (@samant_uday) June 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)