Maharashtra Weather Update: आयएमडी मुंबईने जारी पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज, घ्या जाणून
रत्नागिरी, रायगड, विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात.
नुकताच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा एकदा काही जिल्ह्यांवर पावसाचे सावट आहे. पुढील पाच दिवसांसाठी आयएमडी मुंबईने हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार रत्नागिरी, रायगड, विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात. तसेच नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात 13 मार्चला वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असाही अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)