Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे.
देशातील हवामानात सतत बदल होत आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. ईशान्य मान्सूनचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांवर दिसून येत आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सध्या पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात मेघगर्जना, गडगडाटासह पावसाची तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (हेही वाचा: Pune Water Storage: पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 80 टक्के पाणीसाठा शिल्लक)
जाणून घ्या तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)