Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात 24 एप्रिल पासून काही दिवसांत गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता; पहा जिल्हानिहाय हवामान अंदाज

गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाच्या झळा बसत आहेत. अशात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 एप्रिल 2023 पासून महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात येत्या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया खालील ट्वीट पहा. (हेही वाचा: वांद्रे पश्चिम येथील वॉटरफिल्ड रोड येथील जलवाहिनी फुटल्याने शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत होणार पाणीपुरवठा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)