Maharashtra Weather Update: आज रात्री पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, नांदेड, मुंबई जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून, येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Update: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील जनता मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत आहे. आता आह मान्सूनबाबत चांगली बातमी समोर आली. महाराष्ट्रात 6 जून रोजी नैऋत्य मान्सूनने प्रवेश केल्याची माहिती हवामान खात्याने दिली. यामुळे खालच्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ परिसरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यासह आज रात्री पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, नांदेड, मुंबई या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून, येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा: Maharashtra Rains: अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)