Maharashtra Weather Update: येत्या 24 तासात विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

आता पुन्हा एकदा राज्यात येत्या 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Image Credit : Pixabay

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज काही ठिकाणी थोडी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात येत्या 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी, पालघर, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र पुण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. (हेही वाचा; Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now