Maharashtra Weather Forecast: राज्यात येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा; पहा तपशीलवार जिल्हानिहाय अंदाज व चेतावणी
राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर 24x7 नियंत्रण कक्ष सुरु आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर 24x7 नियंत्रण कक्ष सुरु आहे. अशात हवामान खात्याकडून येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सातारा, पुणे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. (हेही वाचा: Balcony Collapses in Bhayander: भाईंदरमध्ये इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला)
पहा तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)