Maharashtra Weather Forecast: राज्यात 29 मे पासून पुढील 2-3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

IMD च्या अपडेटनुसार महाराष्ट्राच्या काही भागात सोमवार पासून पावसाचा अंदाज आहे.

Rain | Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये 29 मे पासून पुढील 2-3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भ मधील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यंदा मान्सून थोडासा रेंगाळला आहे. पण IMD च्या या अपडेटमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांची कडाक्याच्या उन्हापासून थोडी सुटका होणार आहे. Flight Operations Impacted at Delhi Airport: दिल्ली मध्ये खराब वातावरणामुळे हवाई वाहतूक विस्कळीत .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)