Maharashtra Political Crisis: शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती- Eknath Shinde

शिव सेनेकडून आमदारांना मेल पाठवला असून त्यामध्ये संध्याकाळच्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास अनुपस्थित आमदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Eknath Shinde (Pic Credit - ANI)

महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केले असून, सेनेने भाजपमध्ये सामील व्हावे असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. सध्या हे आमदार एकनाथ शिंदेंसह गुवाहाटी येथे आहेत. अशात सेनेकडून एक मेल या आमदारांना पाठवला असून त्यामध्ये संध्याकाळच्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास अनुपस्थित आमदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केले असून, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now