Maharashtra Monsoon Update: दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल; पुढील 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

आज म्हणजेच 11 जून रोजी राज्यातील दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. साधारण 14 जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागात पाऊस पडणार नाही. या वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. (हेही वाचा: SW Monsoon 2023 Update: आनंदवार्ता! महाराष्ट्रात अखेर नैऋत्य मान्सूनचे आगमन- IMD)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)