Maharashtra MLC Elections Results On ABP Majha and TV9: विधान परिषदेसाठी महाराष्ट्रात निकराची लढत; 'या' ठिकाणी पहा निकालाचे Live Streaming

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

Election Results (Photo Credit-PTI)

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात 30 जानेवारी रोजी शांततेते मतदान झाले. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात 49.28 टक्के, अमरावती विभागात 49.67 टक्के, औरंगाबाद विभागात 86 टक्के, नागपूर विभागात 86.23 टक्के आणि कोकण विभागात 91.02 टक्के मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ला मतमोजणी होणार आहे.

या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तुम्ही घरबसल्या एबीपी माझा आणि टीव्ही 9 च्या माध्यमातून या निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

एबीपी माझा लाइव्ह-

टीव्ही 9 मराठी लाइव्ह-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now