TV 9, Maharashtra Gram Panchayat Election 2022 Results Live Streaming: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे TV9 Marathi वर पहा थेट प्रक्षेपण

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहेत. तुम्ही देखील TV9 Marathi च्या माध्यमातून या निकालाचे थेट प्रक्षेपण व लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात रविवारी म्हणजेच 18 डिसेंबर 2022 रोजी 7,135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होऊन, उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये कैद झाले. आता आज या मतदानाचे निकाल समोर येणार आहेत. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहेत. तुम्ही देखील TV9 Marathi च्या माध्यमातून या निकालाचे थेट प्रक्षेपण व लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.

दरम्यान, राज्यात विदर्भात एकूण 2276 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सिंधुदुर्ग 293, कोल्हापूर 431, सोलापूर 1418, नागपूर 236, नाशिकमध्ये 196,  अहमदनगर 1965 आणि बीडमधील 670 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यंदाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केले. अनेक ठिकाणी परगावी असलेले लोक खास या निवडणुकीसाठी आपापल्या गावी परतले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now