Maharashtra Covid-19: राज्यात मास्क वापरणे अनिवार्य करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह 6 जिल्ह्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह दर वाढत आहे

Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह 6 जिल्ह्यांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह दर वाढत आहे. या जिल्ह्यांमध्ये चाचणी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना मास्क घालण्याचे आणि लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु अजूनतरी मास्क वापरणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला नाही. राज्य मंत्रिमंडळाने वाढत्या कोविड-19 प्रकरणांवर चिंता व्यक्त केली, परंतु अद्याप नवीन निर्बंधांची शिफारस केलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)