81st Anniversary of Quit India Movement: 'भारत छोडो' मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.
'भारत छोडो' मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथील गांधी स्मृती स्तंभ क्रांती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मुंबई येथे 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)