Cabinet Meeting Decisions: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा

यावेळी राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला. यावेळी राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली असून  मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now