Madan Das Devi Passes Away: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन; पुण्यात उद्या अंत्यसंस्कार

मदन दास देवी हे चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये सुवर्णपदक धारक होते मात्र त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला देश आणि समाजासाठी समर्पित केले होते. स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून त्यांनी देशातील कोट्यवधी युवकांना प्रेरणा दिली.

Madan Das Devi Passes Away | Twitter

ष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज (24 जुलै) सकाळी बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. उद्या 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होतील अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विनोद तावडे ते मुरलीधर मोहोळ पर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now