Mumbai MHADA 2023 Lottery: मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 4 हजार 83 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत येत्या 18 जुलैला काढण्यात येणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काल ही माहिती दिली.
Mumbai MHADA 2023 Lottery: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी 4 हजार 83 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार असून आजपासून पासून अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणा-स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत येत्या 18 जुलैला काढण्यात येणार आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काल ही माहिती दिली. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन बोरीकर यांनी केलं आहे. (हेही वाचा - HC on Sameer Wankhede-SRK Leaked Whatsapp Chat: मुंबई उच्च न्यायालयाचे समीर वानखेडे यांना अंतरिम संरक्षणात वाढ, शाहरुखसोबतचे चॅट लिक प्रकरणी सुनावले खडेबोल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)