Lokmanya Tilak National Award 2023 Live Streaming: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला सुरुवात; थोड्याच वेळात PM Narendra Modi यांचा सन्मान

आज लोकमान्य टिळक यांच्या 103 व्या स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान 'लोकमान्य टिळक पुरस्कार' देऊन केला जात आहे.

आज लोकमान्य टिळक यांच्या 103 व्या स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान 'लोकमान्य टिळक पुरस्कार' देऊन केला जात आहे. पुण्यात या सोहळ्याला मुख्य अतिथि म्हणून शरद पवार हजर आहेत. सोबतच सुशील कुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. त्यासोबतच सुशील कुमार शिंदे देखील या सोहळ्याला उपस्थित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मिळवून दिलेले स्थान, त्यांच्या योजना आणि त्यामुळे देशाला मजबूत करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा याद्वारा गौरव करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पुरस्काराने गौरवले जाणारे 41 वे मान्यवर आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)