Lok Sabha Elections 2024: बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

बारामती लोकसभा मतदार संघातून तीनवेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) MP Supriya Sule. (Photo Credit: ANI)

Lok Sabha Elections 2024: बारामती लोकसभा मतदार संघातून तीनवेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केली. त्यांसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनीही सुळे यांच्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. बारामतीत खासदार सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहे. बारामती लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. (हेही वाचा :Sunetra Pawar Files Nomination Papers: सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांची उपस्थिती (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now