Leopard Found in Lohgaon: लोहगाव येथील आरआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर; वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात 2 बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leopard Found in Lohgaon: पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीक कॉलेजच्या (RIT Polytechnic College)आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे. वडगाव शिंदे रस्त्यावर आरआयटी कॉलेज आहे. कॉलेजच्या परिसरात बिबट्या वावरताना (Leopard Spotted in Lohgaon)दिसला. त्यामुळे कॉलेज बंद करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला. बिबट्या अचानक दिसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात २ बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कॉलेज पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. कॉलेजमधील एका कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने बिबट्याला पाहिलं. त्यानंर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. (हेही वाचा:Leopard Spotted in Katraj Ghat: दिवेघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता कात्रज घाटात दिसला बिबट्या (Watch Video))
पोस्ट पहा
Leopard Alert in Lohgaon, Pune!🐆
A leopard was spotted on the premises of RIT Polytechnic on Wadgaon Shinde-Lohgaon Road. Authorities are on high alert as the fire brigade and forest department have arrived at the scene to safely capture the big cat.
Stay tuned for updates.… pic.twitter.com/6Y9c3a59n3
— Punekar News (@punekarnews) August 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 1854 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

