Lata Mangeshkar Death Anniversary: मुंबई पोलिसांच्या बँडतर्फे लतादीदींना मानवंदना; सादर केली त्यांची काही निवडक गाणी (Watch Video)

आज लतादीदींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लतांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai Police (संग्रहित संपादित प्रतिमा)

स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजेच 6 फेब्रुवारी 2022 रोजी लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या रूपाने भारताने एक अनमोल रत्न गमावले. आज लतादीदींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लतांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात मुंबई पोलिसांच्या बँडतर्फे लतादीदींची काही निवडक गाणी वाजवून त्यांना मानवंदना देण्यात आली. आशिष शेलार यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement