Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा होणार जाहीर लिलाव; जाणून घ्या कुठे व कधी

आता लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव होणार आहे.

Lalbaugcha Raja

दरवर्षी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदाही लाखोंच्या संख्येने भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती असल्याची ख्याती आहे, त्यामुळे इथे भाविक मोठ्या प्रमाणात दान-धर्म करतात. आता लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव होणार आहे. रविवारी दि 1 ऑक्टोबर 2023 रोजी, संध्याकाळी ठीक 5 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर हा लिलाव आयोजित करण्यात आलेला आहे. (हेही वाचा: Woloo Women’s Powder Rooms: मध्य रेल्वे मुंबईमधील सात स्थानकांवर सुरु करणार 'वुलू महिला पावडर रूम'; जाणून घ्या शुल्क व काय असेल खास)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement