Kurla Fire Video: कुर्ला परिसरात अग्नितांडव! इमारतीत अडकलेल्या नागरिकांचा खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
भीषण आग लागलेल्या इमारतीतून काही नागरीक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून खाली येताना दिसत आहेत.
मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरात एका इमारातीला भीषण आग लागली असुन या इमारतीत अनेक लोक अडकलेले असल्याची माहिती मिळत आहे. आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट झालं नसलं तरी बचावकार्यासाठी अग्निशामन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. पोलिसांचे पथकही घटनास्थळावर पोहचलं आहे. तरी इमारतीच्या बाहेरचा व्हिडीओ पुढे आला असुन यात काही नागरीक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून खाली येताना दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)