Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वे मार्गावर 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान ट्रेन धावणार मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार!
10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 कोकण रेल्वे मार्गावर विशेष वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात विशेष वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जातात. त्यानुसार यंदाच्या मान्सून साठी 10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. यामध्ये काही गाड्या नियमित चालवण्याऐवजी आठवड्यातल्या विशिष्ट वारी चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे हे वेळापत्रक पाहून तुम्हांला पावसाळ्यातील तिकीटांचे प्लॅनिंग करावं लागणार आहे.
कोकण रेल्वेचं यंदाचं मान्सून स्पेशल वेळापत्रक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)