Kolhapur Panchganga Water Level: कोल्हापूरात पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकानां स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Kolhapur Panchganga Water Level: कोल्हापूरात  पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
Kolhapur Rain (image Credit - ANI Twitter)

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पावसामुळे पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला (Panchganga River) मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुट 03 इंचावर गेली असून नदीच्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट झाल्या असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - Mumbai Pune Express Landslide: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटनेमुळे वाहतुक सेवा ठप्प)

कोल्हापूरात पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकानां स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यामध्ये शाहूवाङी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी, कागल, आजरा, चंदगड आदी तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2023 08:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).