Kolhapur: कोल्हापूर विमानतळाला 31 मार्च 2023 पर्यंत मिळणार वाढीव क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन टर्मिनल इमारत
या विकास प्रकल्पांमध्ये नवीन टर्मिनल इमारत बांधणे, सध्याच्या धावपट्टीचे मजबुतीकरण, धावपट्टीचा विस्तार, नवीन ऍप्रन आणि आयसोलेशन बे बांधणे यांचा समावेश आहे.
कोल्हापूर विमानतळावरील प्रचंड प्रवासी वाहतूक वाढ लक्षात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी विमानतळ विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. या विकास प्रकल्पांमध्ये नवीन टर्मिनल इमारत बांधणे, सध्याच्या धावपट्टीचे मजबुतीकरण, धावपट्टीचा विस्तार, नवीन ऍप्रन आणि आयसोलेशन बे बांधणे यांचा समावेश आहे. कोल्हापूर विमानतळाला 31 मार्च 2023 पर्यंत वाढीव क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. ही नवीन टर्मिनल इमारत 4000 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधली जात आहे. हे जागतिक दर्जाचे टर्मिनल कनेक्टिव्हिटी वाढवेल आणि या प्रदेशातील पर्यटन उद्योगाला चालना देईल.