Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई मध्ये मविआ च्या आंदोलनाला पोलिस परवानगी नाही; हुतात्मा चौक परिसरात शरद पवार, उद्धव ठाकरे दाखल

हुतात्मा चौक भागातच मविआ ने आंदोलन करावं असं आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Jode Maro Aandolan | X @ANI

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला प्रकरणी आता मविआ कडून मुंबई मध्ये जोडे मारो आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्येही शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, खासदार शाहू महाराज,संजय राऊत आदी नेते दाखल झाले आहे. पोलिसांनी या मविआ च्या मोर्चाला गेटवे ऑफ इंडिया कडे जाण्यासाठी परवानगी नाकरली आहे. हे आंदोलन हुतात्मा चौक भागातच करावं असं पोलिसांनी म्हटलं आहे. Jode Maro Andolan In Mumbai: मुंबई मध्ये आज मविआ चे जोडे मारो आंदोलन; राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करणार. 

मविआ च्या आंदोलनाला पोलिस परवानगी नाही

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement