Jaisingh Maharaj More Dies: संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन
पुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जयसिंग महाराज मोरे यांची प्राणज्योत मालवली आहे.
संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे (Jaisingh Maharaj More) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य वारकरी समाजाच्या सेवेसाठी आणि संत तुकाराम तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणींच्या प्रसारासाठी समर्पित केले होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)