TC Saves Woman Passenger: टीसी ठरला देवदूत! मुंबई-कोल्हापूर रेल्वेखाली येण्यापासून महिला प्रवाशाला वाचवले; पुणे स्थानकावरील घटना (Watch Video)
एक महिला प्रवाशी चालत्या ट्रेनखाली जाणार तोच टीसीने महिलेला वाटवले. या घटनेचा व्हिडीो समोर आला आहे.
TC Saves Woman Passenger: पुणे स्थानकावर शुक्रवारी ट्रेन क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस(Koyna Express) आली असताना टीसीच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर मुंबई-कोल्हापूर ट्रेन (Mumbai-Kolhapur Train)आली तेव्हा एक महिला अनवधानाने घसरली आणि चालत्या ट्रेनखाली ओढली जात होती. ही घटना टीसीच्या लक्षात येताच टीसीने महिलेला पकडले त्यामुळे महिलेचा जीव वाचला. रामावतार मीना असे ऑन ड्युटी प्रवासी तिकीट परीक्षकाचे नाव आहे. रामावतार मीना यांनी तात्काळ महिलेला मागे खेचले. ज्यामुळे महिला बटावली गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. महिलेला मागे खेचण्यासाठी रामावतार पुढे आले तेव्हा त्यांच्या मदतीसाठी आणखी दोघे आले.
मुंबई-कोल्हापूर रेल्वेखाली येण्यापासून महिला प्रवाशाला वाचवले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)