Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या 72 तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain (Image Credit - ANI Twitter)

राज्यात अद्याप मान्सून (Monsoon) दाखल झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मुंबई (Mumbai) आणि इतर शहरातील पाण्याचा साठा देखील आटत असल्याने पाण्याच्या कपातीला सामोरे जावे लागू शकते. मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला फटका दिला. त्यामुळे आता राज्यात मान्सूनचा पाऊस कधी पडेल? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता लवकरच मान्सूनचं (Monsoon Update) मुंबईत आगमन होणार आहे. यासंबंधी मुंबईच्या हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. येत्या 72 तासांमध्ये मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)