Eknath Shinde On Mumbai Toll Tax Exemption: टोलमाफीसाठी कोर्टात जाणाऱ्यापैकी मी देखील एक होतो; मुंबईत टोलमाफी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde On Mumbai Toll Tax Exemption: आज महायुती सरकारने मुंबईतील चार टोलनाक्यावर टोलमाफीची घोषणा केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची, प्रवाशांची मागणी होती की, मुंबई एन्ट्री पॉइंटवरील नाक्यावरील टोलमधून सूट मिळावी. मी जेव्हा आमदार होतो, तेव्हा मी यासंदर्भात टोलमाफीचं आंदोलनही केलं होतं. त्यावेळी लोक टोलमाफीसाठी कोर्टातही गेले होते. कोर्टात जाणाऱ्यापैकी मी देखील एक होतो. मला समाधान आहे की, या निर्णयामुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे वेळ, इंधन वाचणार असून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांसह, मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना आम्ही आज राबवली. मुंबईतील टोलमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक असून मास्टरस्ट्रोक आहे, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
टोलमाफीसाठी कोर्टात जाणाऱ्यापैकी मी देखील एक होतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)