HortiProIndia 2024: पुण्यात सुरु होणार भारतातील सर्वात मोठे फुलशेती आणि फलोत्पादन प्रदर्शन; पाहायला मिळणार विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पना
यामध्ये भारतातील आणि परदेशातील शेतकऱ्यांच्या सहभागासह विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाईल.
महाराष्ट्र नर्सरीमेन्स असोसिएशनने, असोसिएशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल हॉर्टिकल्चर आणि वासू इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटीच्या सहकार्याने, पुण्यात हॉर्टीप्रोइंडिया 2024 (HortiProIndia 2024), या भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फ्लोरिकल्चर आणि फलोत्पादन प्रदर्शन आणि परिषदेचे उद्घाटन केले. येत्या 22 नोव्हेंबरपर्यंत पुण्यातील सिंचन नगर येथील न्यू ॲग्रिकल्चरल कॉलेज मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या वनस्पती आणि बागकामातील नवकल्पनांचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये फलोत्पादन तज्ञांसह देश-विदेशातील शेतकरी सहभागी होत आहेत. ते या ठिकाणी व्यावसायिकांना मार्गदर्शन करत आहेत आणि फलोत्पादन क्षेत्रात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.
यामध्ये भारतातील आणि परदेशातील शेतकऱ्यांच्या सहभागासह विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाईल. मुख्य आकर्षणांमध्ये फुले, फळे आणि भाजीपाला वनस्पती, औषधी आणि शोभेच्या वनस्पती, आंतरराष्ट्रीय फुले, हायड्रोपोनिक्स, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, वनस्पती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, हरितगृह तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमामुळे फलोत्पादन क्षेत्रात अनेक रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. हे प्रदर्शन 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले राहणार असून प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आहे. निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांनी भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय फ्लोरिकल्चर प्रदर्शनाचे उद्घाटन केले. (हेही वाचा: Adani Group Convention Centre: अदानी समूह बांधणार मुंबईतील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर; देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर)
भारतातील सर्वात मोठे फुलशेती आणि फलोत्पादन प्रदर्शन-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)