Hinduja Group Investment In Maharashtra: हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात करणार 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, राज्य सरकार सोबत करार- मुख्यमंत्री
राज्यातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील औद्योगीक गुंतवणूक प्रचंड प्रमाणावर घटत असल्याची चर्चा आहे. विरोधक आणि औद्योगिक क्षेत्राचे जाणकारही यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, राज्यातील काही प्रकल्प बाहेर गेले असले तरीसुद्धा राज्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढतच असल्याचे राज्य सरकार दावा करत असते.
राज्यातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील औद्योगीक गुंतवणूक प्रचंड प्रमाणावर घटत असल्याची चर्चा आहे. विरोधक आणि औद्योगिक क्षेत्राचे जाणकारही यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, राज्यातील काही प्रकल्प बाहेर गेले असले तरीसुद्धा राज्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढतच असल्याचे राज्य सरकार दावा करत असते. दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि हिंदुजा ग्रुप यांच्यात नुकताच एक करार पार पडला. या करारानुसार राज्यात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक हुंदुजा ग्रुपद्वारे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)