Hinduja Group Investment In Maharashtra: हिंदुजा ग्रुप महाराष्ट्रात करणार 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, राज्य सरकार सोबत करार- मुख्यमंत्री
राज्यातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील औद्योगीक गुंतवणूक प्रचंड प्रमाणावर घटत असल्याची चर्चा आहे. विरोधक आणि औद्योगिक क्षेत्राचे जाणकारही यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, राज्यातील काही प्रकल्प बाहेर गेले असले तरीसुद्धा राज्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढतच असल्याचे राज्य सरकार दावा करत असते.
राज्यातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील औद्योगीक गुंतवणूक प्रचंड प्रमाणावर घटत असल्याची चर्चा आहे. विरोधक आणि औद्योगिक क्षेत्राचे जाणकारही यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, राज्यातील काही प्रकल्प बाहेर गेले असले तरीसुद्धा राज्याकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढतच असल्याचे राज्य सरकार दावा करत असते. दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि हिंदुजा ग्रुप यांच्यात नुकताच एक करार पार पडला. या करारानुसार राज्यात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक हुंदुजा ग्रुपद्वारे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली.
ट्विट
महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण : हिंदुजा ग्रुप राज्यात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुजा ग्रुप आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. pic.twitter.com/jwnPr64rUh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

