Maharashtra Govt: छत्रपती संभाजी नगर नव्हे, नामांतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबादच; अधिकाऱ्यांना सूचना
जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने (Maharashra Govt) औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीमहाराज नगर असे केले आहे. पंरतू सध्या नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु असून अद्याप नाव बदलले गेले नाही. जोपर्यंत नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत औरंगाबादचे नवीन नाव न वापरण्याची सूचना अधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली आहे. जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)