Mumbai Rains: मुंबई शहरात मुसळधार पावसाची सुरुवात, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार एन्ट्री घेतली आहे. ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. पुणे शहरात काही तासांच्या पावसाने तुंबले आहे. पुणे शहरानंतर मुंबईत रविवारच्या पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे.

mumbai Rain PC TWIITER

Mumbai Rains: महाराष्ट्रात मान्सूनने (Mansoon) जोरदार एन्ट्री घेतली आहे. ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. पुणे शहरात काही तासांच्या पावसाने तुंबले आहे. पुणे शहरानंतर मुंबईत रविवारच्या पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबई (Mumbai) शहराला यलो अलर्ट जाहिर केले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पाणी साचले आहे. रिमझिम पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून सुटका मिळत आहे. ठाणे आणि कल्याण शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस राज्यातील ठिकठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, मुंबई या ठिकाणी ९ जून रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा- उद्या कोकण, दक्षिण मध्य-उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या वीजा चमकत असताना कशी घ्यावी दक्षता)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement