Fire In Chemical Company At Badlapur: बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; एका मजुराचा मृत्यू, 4 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या स्फोटाचे धक्के चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर चार मजूर गंभीर जखमी झाले. ही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

Fire In Chemical Company At Badlapur (फोटो सौजन्स - X/PTI)

Fire In Chemical Company At Badlapur: बदलापूर खरवई एमआयडीसी, ठाणे येथील वीकी केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग (Fire) लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या स्फोटाचे धक्के चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर चार मजूर गंभीर जखमी झाले. ही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. या कारखान्याबाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पोतील केमिकलमध्ये आधी आग लागली आणि नंतर कंपनीत पसरल्याचे कंपनी कर्मचाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar Accident: बसच्या धडकेच चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपप्त जमावाने बस जाळली, चितेगावातील घटना)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement