Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट; लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या लवकर सुरू करा राज ठाकरे यांचं आवाहन

प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रात ऐन एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा 40 शी जवळ असताना या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या लवकर सुरू करण्याचं आवाहन केले आहे. तसेच जनतेला आणि मनसैनिकांना मुक्या पक्षी, प्राण्यांची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

पहा राज ठाकरे यांचे ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement