Government holiday In Maharashtra: अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलाद निमित्त शासकीय सुट्टी

गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सद्वारे ही माहिती दिली.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सद्वारे ही माहिती दिली. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now