Shiv Sena UBT on BMC: ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर; शिवसेनेकडून जोरदार टीकास्त्र

मुंबई महापालिकेकडून शिंदे गटातील माजी खासदारांच्या प्रभागात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्च आणि उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भरघोस निधीवरुन शिवसेना (UBT) पक्षाने सोशल मीडिया हँडल एक्स वरुन जोरदार हल्लाोबल केला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - X)

मुंबई महापालिकेकडून शिंदे गटातील माजी खासदारांच्या प्रभागात केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्च आणि उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या भरघोस निधीवरुन शिवसेना (UBT) पक्षाने सोशल मीडिया हँडल एक्स वरुन जोरदार हल्लाोबल केला आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा आधार घेत एक पोस्ट बनवून ती शेअर करत ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ मुंबई महापालिकेची ऑफर असल्याचा जोरदार टोला पक्षाने लगावला आहे.

शिवसेना युबीटी पक्षाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मिंधे गटात जा आणि महापालिका लूटा!’ अशीच ऑफर मुंबई महानगरपालिकेने सध्या काढलेली आहे.

‘प्रतिकूल परिस्थिती’त वापरण्यात यावा ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राखीव ठेवलेला ‘आकस्मिक निधी’ असतो. सामान्य मुंबईकरांसाठी अशाच प्रकारे राखीव ठेवलेला ‘आकस्मिक निधी’ घटनाबाह्य सरकारने ‘गद्दारी’ करणाऱ्यांवर वापरला आहे. ३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आलेले आहेत.

सामान्य मुंबईकरांसाठी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असलेला निधी ‘गद्दारां’वर खर्च करण्याची ही कुठली स्किम महापालिकेने काढली आहे?

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement