Ghaziabad Road Accident Video: गाझियाबादमध्ये भीषण रस्ता अपघात, बसने स्कूटरला दिली धडक, दोघांचा मृत्यू

या घटनेनंतर रस्त्यावर फक्त रक्तच दिसत होते. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Road Accident

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. ज्यामध्ये स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या दोघांना बसने धडक दिली. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. शहरातील विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रताप विहार येथे सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे राहणारा सुशील कुमार दिल्लीहून मेरठ तिराहेच्या दिशेने जात होता. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती बसली होती. यादरम्यान मागून भरधाव येणाऱ्या बसने स्कूटरला धडक दिली. या अपघातात सुशीलचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now