Gautam Adani Reaches Out To Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या घरी पोहचले गौतम अडानी, मनसे अध्यक्षांचा परिवार ही होता उपस्थित
उद्योगपती गौतम अदानी आणि राज ठाकरे यांची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती समोर येत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेत ठरणारी गोष्ट नुकतीच घडली आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अडाणी व ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट झाली. उद्योगपती गौतम अदानी आणि राज ठाकरे यांची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती समोर येत आहे. यापूर्वी गौतम आदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीनंतर तासाभरात राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)