Maoist Link Case: उच्च न्यायालयाच्या दिलासानंतर नागपूर सेंट्रल जेल मधून बाहेर पडले GN Saibaba (Watch Video)
Nagpur Bench of Bombay High Court कडून 5 मार्चला जीएन साईबाबा यांच्यासोबत 4 जणांची जन्मठेप शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणी अटकेत असलेल्या दिल्लीचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची आज अखेर नागपूर सेंट्रल जेल मधून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जीएन साईबाबा यांच्यासोबत 4 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निकालाविरूद्ध महाराष्ट्र सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका घेऊन गेले आहे. नक्की वाचा: Maoist Link Case: नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात GN Saibaba यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निकाला विरूद्ध महाराष्ट्र सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात!
पहा व्हीडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)