Protest Against Solar Project at Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर सौर प्रकल्पाच्या विरोधात मच्छिमारांचं आंदोलन (Watch Video)

सौर प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती असल्याने मच्छिमारांकडून विरोध केला जात आहे.

Fishing | Twitter/ ANI

जायकवाडी धरणावर सौर प्रकल्पाच्या विरोधात अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर मधील मच्छिमारांनी आंदोलन पुकारलं आहे. हे आंदोलन आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे पण गनिमीकाव्याने आंदोलन पहाटे पासूनच सहाकुटुंब जायकवाडी वर पोहचल्याने पोलिसांकडून त्यांना निघून जाण्याचं आवाहन केले जात आहे. मात्र सरकारच्या या सौर प्रकल्पाला विरोध असणारे आंदोलक प्रकल्प रद्द न झाल्यास जलसमाधी घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून विरोध केला जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)