First Accident In Mumbai Coastal Road Tunnel: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये पहिला अपघात; काही दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन, व्हिडिओ व्हायरल
खराब झालेली गाडी बाहेर पडण्याच्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेला नेली जात असल्यानेही जाम झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
First Accident Inside Mumbai Coastal Road Tunnel: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात गुरुवारी (4 एप्रिल) पहिला अपघात झाला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्याच्या आत छोटी वाहतूक कोंडी दिसून आली. अपघात झालेल्या कारचे व्हिज्युअल फ्री प्रेस जर्नलद्वारे ऍक्सेस केले गेले आहे व सध्या ते व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की काळ्या रंगाची टोयोटा कोरोला अल्टीस कार बिघडली आहे आणि धडकेमुळे कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. खराब झालेली गाडी बाहेर पडण्याच्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेला नेली जात असल्यानेही जाम झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले. तीन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात मरीन ड्राइव्ह एक्झिटजवळील दक्षिणेकडील बोगद्यात दुपारी 2.30 च्या सुमारास झाला.
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)