Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील सानपाडा येथील निवासी इमारतीला लागली भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 14 मधील एका रहिवासी सोसायटीतील बंद घराला आज संध्याकाळी आग लागली. आग विझवण्याचे काम सुरू आहे. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये इमारतीतील एका अपार्टमेंटमधून आगीच्या ज्वाला उठताना दिसत आहेत. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: दिवाळीत मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या फटाके फोडण्याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन; पोलिसांनी दाखल केले 784 FIRs)

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)