Fire at Dapodi Metro Station: दापोडी मेट्रो स्टेशनवर आग; कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ

पीसीएमसी अग्निशमन विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दापोडी मेट्रो स्टेशनमध्ये हाय-टेन्शन पॅनेलची कुलिंग कॉईल गरम झाल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले.

Fire at Dapodi Metro Station (PC -X/@pulse_pune)

Fire at Dapodi Metro Station: पुण्यातील (Pune) दापोडी मेट्रो स्टेशनवर (Dapodi Metro Station) आज सकाळी 11.09 वाजता आग (Fire) लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पीसीएमसी अग्निशमन विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दापोडी मेट्रो स्टेशनमध्ये हाय-टेन्शन पॅनेलची कुलिंग कॉईल गरम झाल्यामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. कृत्रिम श्वसन उपकरण परिधान करून तसेच ABC व Co2 एक्सटिंग्यूशरचा वापर करून आग नियंत्रणात आणली गेली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement