Ferry Boat Capsizes in Mumbai Update: गेटवे जवळ बोट बुडाल्याच्या घटनेत एकाचा मृत्यू, 21 जणांची सुरक्षित सुटका; 34 जणांचा अजूनही शोध सुरू - पोलिसांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या दुर्घटनेत सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती दिली
मुंबई मध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 21 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान अजूनही 34 प्रवाशांंचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटीकडून मदत केली जात आहे. Boat Capsized Near Gateway of India: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू, पहा व्हिडिओ.
गेटवे ऑफ इंडिया जवळ बोट दुर्घटना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)