Eknath Shinde Dasara Melava: एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये 12 फुटाची चांदीची तलवार; झाला विश्वविक्रम

या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

Eknath Shinde Dasara Melava

आज दसऱ्याच्या दिवशी शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. वांद्रा येथे एकनाथ शिंदे यांचा, तर दादरच्या शिवाजी पार्क येथे पारंपारिक उद्धव ठाकरे यांचा. अशात एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये एक विश्वविक्रम झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्या निमित्ताने 12 फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यासोबतच मेळाव्याच्या ठिकाणी अजून एक 51 फुटाची तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीची शस्त्रपूजा करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)